Friends,

Millions of pepole saw 'WHAT' fell down ?

But

There was only one who asked-

'WHY IT FELL DOWN ?'

So he had discovered gravitational force.

Just the same there are so many 'Why' in your mind and to find out the answers of these questions just join us in our creative activities as follows

संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम

स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते ? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.

आकाश निळेच का दिसते ?
सुर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो ?
पानांचा रंग हिरवाच का ?
रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात ?

जिज्ञासा पोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही.
आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न...

  • It is to be learnt effectively Science, must beexperienced, Good Science teaching must be based on observation and experiments.

  • उद्दिष्टे:
  • • विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अभिरुची, संशोधक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
  • • विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी तसेच प्रकल्प निर्माण करण्यासाठी सुटे साहित्य उपलब्ध करू देणे.
  • • विद्यार्थांच्या निरीक्षण व अवलोकन क्षमतेला वाव.
  • • शास्त्रज्ञांचा प्रेरणात्मक जीवनांचा परिचय.
  • • बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करू देणे.

फोटो गॅलरी (करिता फोटोवर क्लिक करा)

व्ही.डी.ओ. (एकूण ६ व्ही.डी.ओ.):

 

कार्यशाळेची वैशिष्ठे:
डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्राचे डॉ. आनंद घैसास यांनी विद्यार्थ्यांना हसत-खेळत प्रयोग शिकविले व प्रयोग करून घेतले.
पुणे विद्यापीठ व एल. जी. कंपनीच्या फिरत्या विज्ञान शाळेद्वारे निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली २०० बाल वैज्ञानिकांनी सुट्ट्या साहित्त्यापासून उपकरणे तयार करून त्यांना ती घरी देण्यात आली.
पुणे विद्यापीठ व एल. जी. कंपनीच्या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान नाटिकेद्वारे अनेक संकल्पनांचे निरसन करण्यात आले.
डॉ. एस. आय. पाटील समन्वयक, फिरती विज्ञान प्रयोगशाळा यांनी मुलभूत संशोधनातील संधी व भावी करिअरविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

संपर्क माहिती

डॉ. कुसळकर हॉस्पिटल जवळ, कोर्ट एरिया, राहुरी. जि. अहमदनगर, (महाराष्ट्र)
दूरध्वनी: ९४२१५५६७५५, ७५८८०९३८३५
ई- मेल: info@drcvramanexam.com